कमवा शिका योजनेतून अजून एक Job पूर्ण!
तंत्रशिक्षण दिशेमधील शिक्षणाला 'कमवा शिका' योजनेची जोड दिल्यास शिक्षण अधिक परिपूर्ण ठरत आहे. अशाच एका कमवा शिका योजनेतील अजून एक Job Work विद्यार्थ्यांनी पूर्ण केले आहे. पूर्वीही अशा प्रकारे विद्यार्थ
आपण २०२२ पासून योग्य विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा व शिका’ योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना केंद्रामध्ये शिकत असताना पर्यायी काम उपलब्ध करून दिले जाते. काही विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये तर काहींना आपल्याच केंद्रावर काम करता येते. अशाच एका कामासाठी बाजूच्या कारखान्यातून Fixture साठी लागणाऱ्या Locating Pin बनवून देण्याची मागणी आली होती. आपल्या संस्थेतील लेथ मशीन ऑपरेटरच्या तुकडीत असणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना आपण हे काम दिले होते. आपल्याच यंत्रशाळेत या विद्यार्थ्यांनी ज्यादा तास थांबून हे काम पूर्ण केले आहे. हे काम करत असताना कंपनीकडून आलेले Drawing वाचणे व Inspection Report तयार करणे असे या विद्यार्थ्यांनी उत्साहाने केले.
यापूर्वी एकूण ६ विद्यार्थ्यांना आपण आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये या योजनेअंतर्गत शिकत असताना काम उपलब्ध करून दिले होते. यामुळे त्यांचे संपूर्ण शिक्षण व निवास/भोजन खर्च काहीही शुल्क न भरता पूर्ण झाले आहे. सध्या ते विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून कंपनीमध्ये उत्तम काम करत आहेत. आपल्या केंद्रावरही काही विद्यार्थ्यांनी याआधी तीन कंपन्यांच्या एकूण सात Job ऑर्डर्स पूर्ण केल्या आहेत. ज्यामध्ये एकूण १०० पेक्षा अधिक Job तयार झाले आहेत. यापुढेही अशा स्वरूपाचे काम आपण केंद्रावर वाढवणार आहोत. तंत्रशिक्षण या दिशेमध्ये विद्यार्थ्यांना शिकत असतानाच जर प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळाला तर ते शिक्षण परिपूर्ण घडते असा अनुभव या सर्व अनुभवातून नक्की मिळतो आहे. कंपनीमधील कामाची पद्धत, कामाची गुणवत्ता, वक्तशीरपणा, काम पूर्ण करण्याची जबाबदारी असे अनेक घटक यामधून त्यांना शिकता येत आहेत. अशाने ही योजना तंत्रशिक्षणाला पूरक ठरत आहे.

कौशल्य प्रशिक्षण केंद्र, शिवापूर
Near Shivapur Wada, Khed-Shivapur, Haweli, Pune - 401102
No comments yet. Login to start a new discussion Start a new discussion